  | 
        
          
            
                
                    | 
                 
               
                
                  
                      | 
                     | 
                      | 
                   
                 
                
                  
                     
                      
                        
                          | Plan
                                Your Tour | 
                         
                        
                          |   | 
                         
                        
                          
                            
                               Tourist
                                      point                                 
                                   
                                         
                                         
                                  
                                    
                                      | --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | 
                                     
                                    
                                      
                                          
                                             | 
                                           
                                          
                                            |   | 
                                           
                                          
                                            | देवगड
                                                किल्ला | 
                                           
                                          
                                            |     | 
                                           
                                          
                                             देवगड
                                                    एस. टी. बस स्थानकापासून 2
                                                  कि.मी. अंतरावर देवगड किल्ला
                                                  आहे. अर.बी.
                                                    समुद्र, आनंदवाडी जेटी आणि
                                                  वाडातरखाडी यांच्या संगमावर
                                                  उभ्या असलेल्या
                                                    देवगड किल्ल्यावरुनच या शहराला
                                                    देवगड हे नांव देण्यात आले
                                                  आहे. इ.स. 1705 साली बांधण्यात
                                                  आलेल्या
                                                    या सुंदर किल्ल्याच्या उभारणीत
                                                    कान्होजी अंग्रे यांच्या मुलाचा
                                                    हातभार लागला. सुमारे 120
                                                  एकर एवढया विस्तृत क्षेत्र फळामध्ये
                                                    पसरलेल्या या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने टेहळणी केंद्र
                                                    म्हणूनच केला जात असे. दि.
                                                    7 एप्रिल 1818 रोजी या किल्ल्याचा
                                                    ताबा इंग्रजांतर्फे कर्नल
                                                    इम्लाकने
                                                    घेतला. या किल्लयावर फारशा
                                                    घडामोडी घडलेल्या आढळत नाही.
                                                    हा किल्ला
                                                    अद्याप सुरक्षीत आहे.  
                                                   
                      किल्ल्यावरील बुरुजापर्यन्त मोठा पुरातन रस्ता असून तो हल्ली
                      डांबरी केला आहे. आतील पायी जाण्यासाठी रस्ताही उत्तम आहे.
                      या किल्ल्यावर पुरातन श्री गणेश मंदिर, इ.स.1915 साली बांधलेले
                      दिपगृह तसेच तीन तोफा आहेत. प्राचीन इमारती नसल्यातरी येथे
                      काही शासकीय इमारती आहेत. किल्ल्यावरुन अथांग सागराचे सौंदर्य,
                      आनंदवाडी जेटी वाडातर वाडी व खाडीवरील पुल सूर्यास्त, देवगड
                      शहर, देवगड बीच, पवनचक्क्या पाहणे अप्रतिम म्हणावे लागेल. उत्तरेकडील
                      फणसे-पडवण्याचा सदाहरितडोंगर पाहताना भान हरवून जाते.  
                                         
                      देवगड किल्ल्यावर अतिशय जाज्वल्य, मांगल्यमय अशा स्वयंभू श्री
                      गणेशाचे मंदिर आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. मच्छिमार
                      आणि गाबित समजाचे हे श्रघ्दास्थान आहे. येथे मारुती मंदिर सुध्दा
                      आहे.   | 
                                           
                                          
                                            | TOP | 
                                           
                                          
                                            |       | 
                                           
                                         
                                        
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | देवगड
                                                  बंदर | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                                निपाणी-राधानगरी-फोंडाघाट-नांदगाव-देवगड
                                                      म्हणून जो राज्यमार्ग ओळखला
                                                      जातो, तो देवगडला ज्या ठिकाणी
                                                      संपतो तेच देवगड बंदर होय.
                                                      देवगड एस.टी. स्थानकापासून
                                                      2 कि. मी. अंतरावर देवगड
                                                    बंदर आहे. स्थानकावरुन बंदराकडे
                                                      जाताना देवगड शहरातूनच जावे
                                                      लागते. वाटेत पूर्वेला आनंदवाडी
                                                      जेटी तर पश्चिमेला देवगड
                                                    समुद्र
                                                      किनारा लागतो. येथे उत्तम
                                                      रस्ता असल्याने पायीच फिरणे
                                                      उत्तम. सुमारे 1 कि.मी.
                                                    लांबीच्या खाडीच्या किना-यावरुन रस्ता
                                                      गेला आहे. वाटेत हिरवीगार
                                                      झाडी, वेडी वाकडी वळणे,
                                                    मच्छिमारी नौकांची ये- जा,
                                                    खाडीतील लहान
                                                      लहान लाटा, नौकांची गर्दी
                                                      आणि मच्छिमारांची वर्दळ
                                                    हे दृश्य अतिशय सुरेख आहे.  
                                                   
                      देवगड बंदराचे उद्घाटन दि. 3 मे 1958 रोजी झाले. पूर्वी या
                      बंदराला वैभवशाली दिवस होते. सागरी मार्गाने कोकणचे प्रवेशव्दारच
                      म्हणण्यास हरकत नाही. पूर्वी गुजरात, मुंबई, गोवा, मंगलोरहून
                      येथे मालवाहतुक चाले. धान्य, पेट्रोल, रॉकेल,मसाल्याचे पदार्थ,
                      लाकूड कौले, मीठ इ. माल घेऊन शिडाची तसेच यांत्रिक मोठमोठी
                      जहाजे येत असत. तसेच पणजी, मुंबई अशी देवगड मार्गे प्रवासी
                      वहातुकही चाले. रत्नागिरी ते सावंतवाडी आणि देवगड ते कोल्हापूर-सांगलीसाठी
                      हेच बंदर जवळचे आणि सुरक्षित होते. ही वाहतुक म्हणजे कोकण विकासाच्या
                      नाडयाच होत्या. परंतु आता वहातुकीची अन्य साधने उपलबध्द झाल्यामुळे
                      तसेच प्रवाशी वहातुक तोटयात आल्यामुळे या बंदारातून होणारी
                      सर्व प्रकारची वहातुक सध्या बंद आहे.  
                                           
                      असे असलेतरी देवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे बंदर नैसर्गिकरित्याच
                      मच्छिमारीसाठी अतिशय सुरक्षित असल्याने मच्छिमारी व्यवसायासाठी
                      या बंदराचा उपयोग मोठया प्रमाणात केला जातो. वेळप्रसंगी शिडाच्या
                      तसेच यांत्रिक अनेक छोटया- मोठया नौका, होडया, पाती, ट्रालर,गलबते
                      या बंदराचा आश्रय घेतात. मच्छी हंगामात देवगड समुद्रात मिळणा-या
                      मच्छीची लिलाव पध्दतीने खरेदी-विक्री येथेच केली जाते. यामुळे
                      या व्यावसायातील हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. मच्छिमारी
                      व्यवसायासंबंधित येथे चार सहकारी संस्था आहेत.  
                                           
                      सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून संपूर्ण
                      कोकण किनारपट्टीवरील सर्व सोयीनी युक्त, अतयाधुनिक मच्छिमार
                      बंदर म्हणून घ्आनंदवाडी जेटीङ नावाने देवगड बंदर विकसित होत
                      असून त्यासाठी शासनाने कित्येक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
                      काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे देवगडचा विकास होणार आहेच, शिवाय
                      मच्छिमारी व्यवसायाबाबतही देवगड जगाच्या नकाशावर येणार आहे.  | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | पवन
                                                  विद्युत प्रकल्प (पवनचक्क्या) | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                                तीस
                                                      वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील
                                                      पिहिला पवन विद्युत प्रकल्प
                                                      देवगड येथे उभारण्यात आला.
                                                      येथे वीसअजस्र पवनचक्कयांपासून
                                                      वीज निर्मिती केली जात आहे.
                                                      देवगड एस.टी स्टँड पासून 1।।
                                                      कि.मी. अंतरावर देंवग्ाड शहराच्या
                                                      पश्चिमेस समुद्र किनारी उंच
                                                      पठारावर हा प्रकल्प आहे. 
                      हा सर्व परिसर पहाण्यासारखा आहे. येथ्सून कुणकेश्वरचा हिरवागार
                      डोंगर, पांढरा शुभ्र मिठमुंबरी आणि देवगड समुद्र किनारा, निळा
                      अथांग पसरलेला अरबी समुद्र, देवगड किल्ला, देवगड बंदर, देवगड
                      दीपगृह, आनंदवाडी जेटी, देवगड शहर दिसते. महाबळेश्वर सारखाच
                      येथे सूर्यास्त दिसतो. 
                                           
                      पवनचक्की पर्यंत जाण्यासाठी उत्कृष्ट डांबरी रस्ता आहे. सुमारे
                      1।। कि.मी. अंतरातील वरील ठिकाणे पायीपायीच फिरणे उत्तम. सायंकाळी
                      पाच वाजल्यानंतर हा परिसर गजबजलेला असतो.  | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | देवगड
                                                  बंदर | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                                निपाणी-राधानगरी-फोंडाघाट-नांदगाव-देवगड
                                                      म्हणून जो राज्यमार्ग ओळखला
                                                      जातो, तो देवगडला ज्या ठिकाणी
                                                      संपतो तेच देवगड बंदर होय.
                                                      देवगड एस.टी. स्थानकापासून
                                                      2 कि. मी. अंतरावर देवगड
                                                    बंदर आहे. स्थानकावरुन बंदराकडे
                                                      जाताना देवगड शहरातूनच जावे
                                                      लागते. वाटेत पूर्वेला आनंदवाडी
                                                      जेटी तर पश्चिमेला देवगड
                                                    समुद्र
                                                      किनारा लागतो. येथे उत्तम
                                                      रस्ता असल्याने पायीच फिरणे
                                                      उत्तम. सुमारे 1 कि.मी.
                                                    लांबीच्या खाडीच्या किना-यावरुन रस्ता
                                                      गेला आहे. वाटेत हिरवीगार
                                                      झाडी, वेडी वाकडी वळणे,
                                                    मच्छिमारी नौकांची ये- जा,
                                                    खाडीतील लहान
                                                      लहान लाटा, नौकांची गर्दी
                                                      आणि मच्छिमारांची वर्दळ
                                                    हे दृश्य अतिशय सुरेख आहे.  
                                                   
                      देवगड बंदराचे उद्घाटन दि. 3 मे 1958 रोजी झाले. पूर्वी या
                      बंदराला वैभवशाली दिवस होते. सागरी मार्गाने कोकणचे प्रवेशव्दारच
                      म्हणण्यास हरकत नाही. पूर्वी गुजरात, मुंबई, गोवा, मंगलोरहून
                      येथे मालवाहतुक चाले. धान्य, पेट्रोल, रॉकेल,मसाल्याचे पदार्थ,
                      लाकूड कौले, मीठ इ. माल घेऊन शिडाची तसेच यांत्रिक मोठमोठी
                      जहाजे येत असत. तसेच पणजी, मुंबई अशी देवगड मार्गे प्रवासी
                      वहातुकही चाले. रत्नागिरी ते सावंतवाडी आणि देवगड ते कोल्हापूर-सांगलीसाठी
                      हेच बंदर जवळचे आणि सुरक्षित होते. ही वाहतुक म्हणजे कोकण विकासाच्या
                      नाडयाच होत्या. परंतु आता वहातुकीची अन्य साधने उपलबध्द झाल्यामुळे
                      तसेच प्रवाशी वहातुक तोटयात आल्यामुळे या बंदारातून होणारी
                      सर्व प्रकारची वहातुक सध्या बंद आहे.  
                                           
                      असे असलेतरी देवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे बंदर नैसर्गिकरित्याच
                      मच्छिमारीसाठी अतिशय सुरक्षित असल्याने मच्छिमारी व्यवसायासाठी
                      या बंदराचा उपयोग मोठया प्रमाणात केला जातो. वेळप्रसंगी शिडाच्या
                      तसेच यांत्रिक अनेक छोटया- मोठया नौका, होडया, पाती, ट्रालर,गलबते
                      या बंदराचा आश्रय घेतात. मच्छी हंगामात देवगड समुद्रात मिळणा-या
                      मच्छीची लिलाव पध्दतीने खरेदी-विक्री येथेच केली जाते. यामुळे
                      या व्यावसायातील हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. मच्छिमारी
                      व्यवसायासंबंधित येथे चार सहकारी संस्था आहेत.  
                                           
                      सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून संपूर्ण
                      कोकण किनारपट्टीवरील सर्व सोयीनी युक्त, अतयाधुनिक मच्छिमार
                      बंदर म्हणून घ्आनंदवाडी जेटीङ नावाने देवगड बंदर विकसित होत
                      असून त्यासाठी शासनाने कित्येक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
                      काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे देवगडचा विकास होणार आहेच, शिवाय
                      मच्छिमारी व्यवसायाबाबतही देवगड जगाच्या नकाशावर येणार आहे.  | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | खवळे
                                                  महागणपती, तारामुंबरी | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                               देवगड
                                                      एस.टी. स्थानकापासून दक्षिणेला
                                                      2 किमी. अंतरावर तारामुंबरी
                                                      हे सागर किना-यावरील गांव,
                                                      डोंगराच्या उतरणीला, नारळाच्या
                                                      आणि हापूस आंब्याच्या गर्द
                                                      राईत कोकणातील खेडेगावाची
                                                      सुंदरता घेऊन नटलेले गांव.
                                                      या गावात कै. नाना खवळे
                                                    यांचे घर आहे. तेच खवळे गणपतीचे
                                                      देवघर होय. याच घरी अनेक
                                                    वैशिष्टयांने
                                                      नटलेला गणपती दरवर्षी येतो.
                                                      या मंदिरापर्यंत जाण्यासाठी
                                                      रस्ता अतिशय उत्तम आहे आणि
                                                      कोकणी सौंदर्याची उकल करून
                                                      देणारा आहे. देवगडहून श्री
                                                      ब्राह्मणदेव मंदिर, मिठमुंबरी
                                                      खाडी, मिठमुंबरी किनारा
                                                      आणि कुणकेश्वर या पर्यटन
                                                      स्थळाकडे
                                                      जाताना वाटेतच खवळे महागणपती
                                                      देवालय आहे. जामसंडे येथील
                                                      श्री दिर्बादेवीचे हे माहेरघर
                                                      समजले जाते. 
                                                   
                      हा गणपती प्रथम इ.स.1705 साली आसनाधिष्ठित झाला. गणपतीचेठिकाण
                      जरी तेच असले तरी त्याची मूर्ती प्रत्येकवर्षा नवीन केली जाते.
                      हे याचे वैशिष्टय आहे्. ही मूर्ती साधारणत: दीड टन वजनाची असते.
                      ती पूर्णत: भरीव असते. हा गणपती प्राचीन असल्यामुळे तो आजच्या
                      प्लास्टर ऑफ पॅरीसच्या जमान्यातही साध्या मातीपासूनच बनविला
                      जातो. ती माती सुध्दा ठराविक स्थानिक ठिकाणातूनच (पळशी-भटवाडी)
                      आणली जाते. 
                                           
                      ही माती गणपतीसारखी फार दिखाऊ किंवा रंगरंगोटी केलेली नसते.
                      ढोबळमानानं तिचं आगळं रूपडं काहीसं उग्र भासत असल तरी मूतीर्च्या
                      एकटक दर्शनाने जणू ती आपल्याशी बोलतेच आहे असा भास होतो. प्रतिवर्षी
                      मूर्तीमध्ये किंचितही बदल केला जात नाही. या गणपतीची मूर्ती
                      दरवर्षी एकाच रंगाची, आकाराची आणि उंचीची असते. 
                                           
                                          नारळी पौर्णिमेच्या दिवशी येथील गणपतीची
                                          मूर्ती बनवायला सुरूवात करतात. येथील
                                          खवळे घराण्यातील पुरूषांनी ही मूर्ती
                                          बनवावी लागते.
                      साधारणपणे हा गणपती उत्सव 21 दिवस चालतो. या मूर्तीला गणेश
                      चतुर्थी दिवशी पूजेला बसविताना मूर्तीच्या अंगाला फक्त सफेद
                      रंग लावून डोळे रंगविले जातात. दुस-या दिवशी उंदिर पूजेला
                                          ठेवला जातो. तो वेगळया आसनावर असतो.
                                          या दुस-या दिवसापासून गणेश मूर्तीच्या
                      रंगकामाला सुरूवात करतात. पाचव्या दिवशी रुगकाम पूर्ण होते.
                      मूर्तीच्या संपूर्ण अंगाला लाल रंग, पिवळया रंगाचे पितांबर,
                      चांदीच्या रंगाचा अंगरखा, डोक्यावर दीड फूट उंचीचा सोनेरी
                                          मुकूट,
                      त्यावर पाच फणी नाग, दोन हातावर निळसर शेला अशी ही मूर्ती
                                          असते. रंगकाम नित्य नेमाने चालूच असते.
                                          शेवटचे रंगकाम विसर्जनाच्या
                      दिवशी दुपारी केले जाते. अशा प्रकारे प्रथम सफेद रंग, नंतर
                      पूर्ण रंगकाम झालेला व शेवटच्या दिवशी पिवळया
                      ठिपक्यांचा अशा वेगवेगळ्या तीन रूपायात
                      साकार होणारा हा जगातील कदाचित पहिलाच गणपती असेल. 
                                           
                      या मूर्तीचे विसर्जन मंगळवारी आणि शनिवारी केले जात नाही. विसर्जनाच्या
                      दिवशी दुपारी खवळे घराण्यातील मागील सर्व पिढीतील मृत व्यक्तींना
                      पिंडदान केले जाते. गणपतीच्या बाजूला पिंडदान होणारा हा जगातील
                      पहिलाच गणपती ! असा हा आगळा-वेगळा खवळे महागणपती !!  | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | श्री
                                                  दिर्बादेवी मंदिर, जामसंडे | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                               देवगड-नांदगांव
                                                      मार्गावर देवगड एस.टी. स्थानकापासून
                                                      3 कि.मी. अंतरावरील जामसंडे
                                                      गावात 300 वर्षापूर्वीची श्री
                                                      दिर्बादेवी आणि श्री रामेश्वर
                                                      अशी दोन मंदिरे एकाच ठिकाणी
                                                      अतिशय निसर्गरम्य शांत ठिकाणी
                                                      आहेत. हे जामसंडे-देवगडचे
                                                      ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतांसभोवती
                                                      नारायण, आदिनाथ गणपती, पावणाई,
                                                      मारूती, ब्राह्मणदेव हे मंदिर
                                                      आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी
                                                      उत्तम डांबरी रस्ता आहे. 
                                                   
                      पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारात देवगड बंदराला फार महत्वाचे
                      स्थान आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात मूर्तीचा व्यापार
                      होत असे. बहुदा वादळात भरकटलेल्या जहाजावरील कुणा व्यापाराने
                      जहाजावरील बोजा कमी करण्यासाठी किंवा मूर्ती भंजक यवनांपासून
                      मूर्ती वाचविण्यासाठी समुद्रात दडवली असावी. ही मूर्ती गाबीत
                      समाजातील खवळे-ढवळे मंडळींना देवगड-मिठमंबरी समुद्र परिसरात
                      दिर्बादेवी झाले. 
                                           
                      श्री देवी दिर्बादेवीची मूर्ती सुषुम्ना स्वरातील असून हातात
                      आयूधे म्हणून एका हातात सुरा व दुस-या हातात तेलाची वाटी आहे.
                      हे एक सुरक्षित मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे 700-800 वर्षांपूर्वीची
                      विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचे नाक ठेचलेले आहे. यावरून
                      शैव व वैष्णव धार्मिक वादाची ही साक्ष आहे हे स्पष्ट होते.
                      देव रामेश्वर हा शैवांचा व वैष्णवांचा देव विष्णु होता. मात्र
                      रामेश्वराची पिंडी पूजतात म्हणून विष्णूची मूर्ती मागील बाजूला
                      आहे. या मूर्तीवरचे विष्णूच्या दशावताराचे कोरीव काम अप्रतिम
                      आहे. जिज्ञासूनी ते जरूरी पहावे. कोकणातील ब-याच देवस्थानात
                      अशा मौल्यवान प्राचीन मूर्ती आहेत.  
                                           
                      कान्होजी आंग्रे यांनी दिर्बादेवीला प्रदान केलेली तोफ रामेश्वर
                      मंदिरासमोंर आहे. 
                       
                      हा भव्य परिसर अतिशय रम्य आहे.   | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | श्री
                                                  क्षेत्र कुणकेश्वर | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                               कोकणची
                                                      काशी समजले जाणारे तीर्थ
                                                    क्षेत्र, रस्त्याने देवगडपासून
                                                    15 कि.मी.
                                                      अंतरावर आहे. कुणकेश्वर
                                                    मुंबईपासून 453 कि.मी. तर
                                                    नांदगावपासून
                                                      45 कि.मी. अंतरावर आहे.
                                                    अरबी समुद्राच्या किना-यावर
                                                    अत्यंत्ा
                                                      निसर्गरम्य परिसरात हे स्थळ
                                                      आहे. तेथे शंकराचे मंदिर
                                                    आहे. देवगडपासून कुणकेश्वरपर्यंत
                                                      संपूर्ण रस्ता नागमोडी,
                                                    घाटाचा
                                                      आणि आमराईतून गेला आहे.
                                                    वाटेत माडांच्या आणि चिकूच्या
                                                    बागाही लागतात.
                                                    देवगडपासून कुणेश्वर पर्यंत
                                                    रस्तयाने वहानाने जाण्यास
                                                      1 तास लागतो. मंदिरापर्यंत
                                                      जाण्यास उत्तम डांबरी रस्ता
                                                      आहे. देवगडहून कुणकेश्वरला
                                                      पायी-पायीही जाता येते.
                                                    पायी पायी जाण्यास साधारणत:
                                                    1 ।।
                                                      तास लागतो. या मार्गे जाताना
                                                      2 कि.मी. आमराइतून गेलेला
                                                      डांबरी रस्ता, त्यानंतर
                                                    होडीने ओलांडावी लागणारी सुंदर
                                                    खाडी,
                                                      त्यानंतर सुमारे 1 कि.मी.
                                                      लांबीचा स्वच्छ, पांढरा
                                                    शुभ्र वाळूचा, निळाशार प्ााण्याचा
                                                      विस्तीर्ण आणि स्वच्द
                                                      किनारा आणि उर्वरित प्रवास
                                                      हा समुद्र किना-यावरून,
                                                    समुद्र लाटांच्या व मंजूळ
                                                    आवाजाच्या
                                                      सानिध्यातून डोंगरातून गेलेल्या
                                                      पायवाटेचा आहे.  
                                                   
                                                   स्वच्छ,
                                          सुंदर आणि पांढ-या शुभ्र वाळूची लांबच
                                          लांब कातवण गावापर्यंत पसरलेली सुमारे
                                          5 कि.मी. लांबीची किनरपट्टी कुणकेश्वरला
                                          लाभली आहे. निसर्गाने कुणकेश्वरला अप्रतिम
                                          सौंदर्य बहाल केले आहे. या भागात नारळ,
                                          पोफळी, काजूच्या असंख्य राई आहेत. येथे
                                          विपुल प्रमाणात मत्स्य संपत्ती आहे. पारंपारिक
                                          रापण पध्दतीने येथे मासेमारी केली जाते. 
                                           
                      येथील शंकराचे मंदिर म्हणजे शिल्पाकृतीचा आणि स्थापत्य कलेचा
                      उत्कृष्ट नमुनाच आहे. अकराव्या शतकाच्या दरम्यान यादवांनी हे
                      मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी
                      शैलीचे असले तरी त्यावर कोकणी संस्कृतीचा प्रभाव आढळतो. या
                      मंदिराच्या शिखरावर अनेक शिल्पे आहेत. विशेषत: वेद, भैरू, कामधेनू
                      इ. शिल्पे लक्षणीय आहेत. मंदिरात शिवलिंगाशिवाय पाव्रती मातेचीही
                      मूर्ती आहे. याशिवाय नंदीच्या मागील बाजूस श्री देव मांडलीक
                      मंदिर, समाधी मंदिर तसेच परिसरामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे
                      आहेत. मंदिराच्या पूर्वेला डोंगर उतरणीवर इ.स.920 साली गुहा
                      उघडकीस आली आहे. त्याची माहिती या पर्यटन गाईड मध्ये स्वतंत्र
                      दिली आहे. 
                                           
                                           कोकणातील
                                          इतर मंदिराप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांनी
                                          कुणकेश्वर मंदिराला ब-याच वेळ भेटी दिल्याचे
                                          संदर्भ आढळतात. त्यांनी या मंदिराच्या
                                          जीर्णोध्दारही केला होता. येथे दरवर्षी
                                          महाशिवरात्रीला यात्रा भरते. 
                                           
                      असे आध्यात्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, पवित्र ठिकाण सौंदर्याने
                      ओतप्रोत भरलेले आहे. हल्ली येथे पर्यटकांचा लोंढा वाढलेला आहे.  
                      या ठिकाणी रहाण्याकरिता भक्त निवास आहे. | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | पोखरबांव
                                                  गणपती | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                              देवगड-आचरा-मालवण
                                                      मार्गावर देवगड पासून 13
                                                    कि.मी. अंतरावर रस्त्याला
                                                    लागूनच
                                                      पोखरबांव येथे एक प्राचीन
                                                      गणपती मंदिर आहे. हल्ली
                                                    तेथे भव्य देखणे मंदिर बांधले
                                                    असून
                                                      शेजारीच भलामोठा मंडप उभारला
                                                      आहे. तेथे अनेक सोयी-सुविधा
                                                      केल्या असल्यातरी तेथे रहाण्या-जेवणाची
                                                      सोय नाही. सुंदर बगीचा केला
                                                      आहे. विश्रांतीसाठी आणि
                                                    भोजनासाठी दोन मंडप आहे. त्यापैकी
                                                    एक
                                                      कायम स्वरूपी तर एक तात्पुरता स्वरूपाचा आहे. तेथे बारामाही
                                                      पाण्याचा झरा आहे. अतिशय
                                                      रम्य असे हे नैसर्गिक आणि
                                                      धार्मिक
                                                      स्थळ आहे. स्वत:सोबत जेवण
                                                      घेऊन कुटुंब, शाळेच्या सहली
                                                      यांनी येथे वनभोजन करून
                                                      पर्यटनाचा आनंद लुटण्यास
                                                      हरकत नाही.
                                                      येथे आपण साहित्य नेऊन जेवण
                                                      बनवून जेवणाचीही सोय आहे.  
                                                   
                      या मंदिराच्या सभोवतालच्या सुमारे 15-20 कि.मी. परिसरातील संपूर्ण
                      परिसर हा हापूस आंब्याने बहरलेला आहे.  | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | श्री
                                                  गजबादेवी मंदीर, मिठबांव-तांबळडेग | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                              देवगडपासून
                                                      30 कि.मी. असलेल्या मिठगांवपासून
                                                      3 कि.मी. अंतरावर एका टेकडीवर
                                                      श्री गजबादेवी मंदिर आहे.
                                                      येथून तांबळडेग 1 कि.मी.
                                                    आहे. पश्चिमेला अरबी समुद्र,
                                                    अतिशय
                                                      विशाल व रम्य किनारपट्टी
                                                    लाभलेल्या टेकडीवर अतिशय देखणे
                                                    असे हे
                                                      मंदिर आहे. हे मंदिर पुरातन
                                                      असले तरी मूळ आद्यस्थानाचा
                                                      जीर्णोध्दार शालिवाहन शके
                                                      1842 रौद्र नाम संवत्सर
                                                    माघ शुध्द एकादशी शुक्रवार
                                                    दि.18 फेब्रुवारी
                                                    1921 रोजी फाटक-मिराशी या
                                                    गावकरी मंडळींनी केला येथे
                                                      प्रतिवर्षी 18 मे रोजी श्री
                                                      सत्यनारायणाची महापूजा केली
                                                      जाते. 
                                                   
                      या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दांडगाईदेवीचे एक छोटे मंदिर
                      असून समोर भव्य कमान आणि एक आकर्षक दीपमाळ आहे. दीपमाळेवर ध्वज
                      आहे. येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 
                                           
                      शेजारीच रम्य तांबळडेग बीच आहे. मंदिर परिसरातून दिसणारा रम्य
                      सागर किनारा, सुरूचे बन, निळाशार अरबी समुद्र आणि सूयर्यास्ताचे
                      विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे आहे. पायथ्याशी सपाट कातळ पसरलेले
                      असून त्यात जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव व शैवाल,
                      शंख-शिंपले सापडतात. सायंकाळी 5 वाजल्यानंतर येथे भेट देणे
                      उत्तम. मंदिराच्या जवळपास गाडीने जाता येते.  | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | सैतवडे
                                                  धबधबा | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                               नांदगांव-देवगड
                                                      मार्गावर देवगड पासून सुमारे
                                                      27 कि.मी. अंतरावर तोरसोहे
                                                      फाटा आहे. तेथून सैतवडे
                                                    धबधबा 3 कि.मी. अंतरावर आहे.
                                                    हा
                                                      संपूर्ण रस्ता कच्चा आहे.
                                                      तसेच याच मार्गावर नांदगांवपासून
                                                      13 कि.मी. अंतरावर शिरगांव
                                                      आहे. तेथून हा धबधबा 6 कि.मी.
                                                      अंतरावर आहे. येथून जवळच
                                                    सैतवडे आणि पाडाघरवाडी अशी
                                                    दोन गावे
                                                      आहेत. म्हणून याला सैतवडे
                                                      धबधबा किंवा पाडाघर धबधबा
                                                      असे म्हणतात. जिल्हयाचा पर्यटन
                                                      नकाशा तयार करताना या धबधब्याच्या
                                                      आवर्जून उल्लेख करण्यात
                                                      आला आहे. जवळ नदी पलीकडच्या
                                                      निसर्गरम्य
                                                      परिसरात श्री गिरावळदेवीचे
                                                      मंदिर आहे. 
                                                   
                      येथे भरपूर बारमाही पाणी आहे. उंच खडकामधून पडणारा हा धबधबा
                      पर्यटकांना नेत्रसुख देणारा आहे. सभोवती असणा-या निसर्गरम्य
                      परिसरामुळे या धबधब्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. पावसाळयात
                      पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने या कालखंडात
                      जरा जपूनच आनंद लुटला पाहिजे. पावसाळयात येथील सौंदर्य पहाणे
                      हा एक सुखद अनुभव असतो. पावसाळयात वाहणा-या नदीच्या प्रचंड
                      प्रवाहामुळे डोंगर फोडला जाऊन त्याचे दोन भागात विभाजन झाले
                      आहे. इतर वेळेला प्रवाह बेताचाच असतो. सतत वाहणा-या पाण्यामुळे
                      काळया खडकात सुंदर तळे निर्माण झाले आहे. धबधब्यासमोरील नदीचे
                      पात्र रूंद आणि कमी खोलीचे असल्यामुळे त्यात स्नानाचा आणि पोहण्याचाही
                      आनंद लुटता येतो. 
                                           
                      येथील निसर्गरम्य परिसर पहाताच आपले भान हरपून जाते. तन-मनाला
                      उल्हासित करणारा इथला गारवा अलौकिक शांतीचा, स्तब्धतेचा प्रत्यय
                      देतो. येथे नेहमीच आसपासच्या शाळा वनभोजनासाठी येत असतात्ा.
                      येथे चहापाणी, जेवण, रहाण्याची सोय नाही. मात्र स्वत:चे जेवण
                      नेऊन किंवा जेवणाचे साहित्य नेऊन तेथे जेवण बनवून भोजन करून
                      आनंद लुटण्यासारखे हे ठिकाण आहे. | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              | विजयदुर्ग
                                                  किल्ला | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                               पाण्यात
                                                      पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली,
                                                      सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या
                                                      आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू,
                                                      आंग्रे घराण्याचे बलस्थान
                                                      आणि शिवरायांच्या ऐतिहासिक
                                                      पराक्रमाची साक्ष देणारा
                                                    तरीपण फितुरीला बळी पडलेला
                                                    विजयदुर्ग
                                                      किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या
                                                      उत्तरेला टोकाला आहे. सुमारे
                                                      40 किमी. लांबीच्या वाघोटण
                                                      खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या
                                                      संगमावरच हा किल्ला उभा
                                                    आहे. हा
                                                    आरमारी किल्ला म्हणून ओळखल्ाा
                                                      जातो. 
                                                   
                      हा किल्ला इ.स.1200 च्या सुमारास शिलाहार राजाच्या कारकर्दित
                      बांधला असावा. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.1653 मध्ये
                      आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब्जात घेतला आणि त्यामध्ये
                      अनेक सुधारणा केल्या. स्वराज्याचा भगवा ध्वज तेथे फडकविला.
                      त्यावेळी विजय संवत्सर चालू होते. त्यावरूनच या किल्ल्याचे
                      नांव विजयदुर्ग ठेवले. सुमारे 700 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर
                      अंत्यंत प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर
                      कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे
                      शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले. 
                                           
                      पूर्वी हा किल्ला चारी बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला
                      होता. म्हणूनच या किल्लयाला जलदुर्ग म्हणत. किल्ल्याच्या पूर्व
                      बाजूला बराच मोठा खंदक होता. तो पाण्याने भरलेला असायचा. किल्ल्यात
                      जाण्यासाठी खंदकावर लाकडी पूल होता. रात्री तो काढून ठेवला
                      जात असे. अलिकडे तो खंदक बुजवून रस्ता तयार केला आहे. 
                                           
                      गेली सुमारे 800 वर्षे समुद्राच्या लाटांचे तडाखे आणि ताफांचा
                      भडीमार सहन करूनही विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत
                      आहे. या किल्ल्याचे क्षेत्र 17 एकर 15 गुंठे असून या किल्ल्याला
                      20 बुरूज आहेत. त्िाहेरी तटबंदी असलेल्या या किल्ल्याच्या सर्वात
                      बाहेरच्या समुद्राकडील तटाची उंची 36 मी. आहे. किल्ल्यात असलेल्या
                      प्रचंड भांडारागृहावर काही वर्षापूर्वी बांधलेले विश्रामगृह
                      आज बंद आहे. शेजारीच एक बराच मोठ बांधकाम केलेला तलाव आहे.
                      मात्र तो कोरडाच आहे. किल्ल्यात एक बारमाही पाणी असलेली विहीर
                      आहे. 
                                           
                                                   ह्या
                                                    किल्ल्याचे सौंदर्य पहाणे,
                                                    त्याचे ऐतिहासिक महत्व जाणून
                                                    घेणे अभ्यासकांना,
                                                    जिज्ञासूंना, संशोधकांना,
                                                    पर्यटकांना एक मेजवानीच ठरते.
                                                    सुमारे 1
                                                    किमी. अंतरावरून हा किल्ला
                                                    पाहून डोळयाचे पारणे फिटते.
                                                    किल्ल्याजवळ
                                                    गेल्यानंतर प्रथम आपल्याला
                                                    वक्राकृती तटबंदी दिसते. मुख्य
                                                    अतिसुरक्षित
                                                    दरवाजाजवळ शक्तीचे प्रतीक
                                                    समजले जाणारे हनुमान मंदिर
                                                    आहे. त्या
                                                    वेळच्या गरजेनूसार किल्ल्यावर
                                                    अनेक लहान म्ाोठ्या बांधलेल्या इमारती
                                                    असून त्यातील बहुतांश इमारती
                                                    कोसळलेल्या आहेत. किल्ल्यात
                                                    एक पुरातन वटवृक्ष आहे. या
                                                    वटवृक्षाखाली
                                                    भगवान शंकर आणि भवानी मातेचे
                                                    मंदिर ते असून ते अद्यापही
                                                    सुस्थितीत आहे. या शिवाय तोफगोळे,
                                                    दीपगृह,
                                                    धान्याचे आणि दारूचे कोठार,
                                                    ध्वजाचे ठिकाण, तुळशीवृंदावन,
                                                    बांधकामाचा चुना मळण्याची
                                                    जागा, पागा, कैदखाना, राहणा-या
                                                    लोकांना
                                                    पिण्याचे पाणी मिळावे यासाठी
                                                    प्रचंड मोठ्या आकाराच्या टाक्या,
                                                    पिराची सदर, नगारखाना, खलबतखाना,
                                                    साहेबांचे
                                                    ओटे इ. ठिकाणे पहाण्यासारखी
                                                    आहेत. 
                                                   
                      किल्ल्यातून विजयदूर्ग गावातील धुळपांच्या वाड्यापर्यंत सुमारे
                      2 कि.मी. लांबीचे एक भूयार आहे. या भूयाराच्या दोन्ही बाजूकडील
                      मार्ग बुजले असल्याने त्यात प्रवेश करता येत नाही. येथील धुळपांचा
                      वाडा पहाण्यासारखा आहे. या वाड्यात माडीवरच्या दिवाणखाण्यात
                      भिंतीवर बरीच जुनी रंगीत चित्रे आहेत. दीड-दोन शतके उलटून गेली
                      असली तरी त्यांचे रंग अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत. 
                                             
                      हा किल्ला समुद्राने वेढलेला असल्यामुळे समुद्राच्या अजस्र
                      लाटा बुरूजावर सतत आदळत असतात. त्यामुळे लाटांनी बुरूजांना
                      हानी पोहचू नये म्हणून प्रतये बुरूजाखाली समुद्राच्या बाजूने
                      मांठेमोठे दगड टाकलेले आहेत. प्रचंड कठीण दगडावर लाटा आपटून
                      फुटतात. त्यामुळे बुरूज सुरक्षित राहिलेले आहेत. 
                                             
                      विजयदुर्ग किल्ल्यावरून 140 वर्षांपूर्वी हेलिअम या मूलद्रव्याचा
                      शोध लागला होता. दि.18 ऑगस्ट 1868 रोजी खग्रास सूर्यग्रहणाच्या
                      काळात प्रथमच वैज्ञानिक कसोटीवर या ग्रहणाचे निरीक्षण झाले
                      आणि फ्रेंच स्ांधोधन पिएरे ज्युल्स् सीझार जॉन्सेन तसेच ब्रीटीश
                      खगोल तज्ज्ञ जे. नॉर्मन लॉकिअर यांनी स्पेक्ट्रोस्कोप वापरून
                      ग्रहण काळातल्या प्रकाश वलयावरून हेमिअमचा आढळ प्रात्यक्षिकाद्वारे
                      सिध्द केला. 
                                             
                      या किल्ल्यापासून भल्यामोठ्या पण सुरक्षित वाघोटण खाडीची सुरूवात
                      होते. येथे नौका विकाराचा आनंद लुटता येतो. 
                                             
                      विजयदुर्ग हा केवळ किल्ला नसून ते एक अत्यंत पवित्र असे क्षेत्र
                      आहे. | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | विजयदुर्ग
                                                  बंदर | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                               विजयदुर्ग
                                                      हे संपूर्ण कोकण किनारपट््टीवर
                                                      एक महत्वपूर्ण आणि सुरक्षित
                                                      बंदर आहे. विजयदुर्ग किल्ल्यानजीक
                                                      हे बेदर आहे. ब्रिटीशांच्या
                                                      आणि मराठयाच्या काध्हात
                                                    या बंदरात फार मोठी वर्दळ
                                                    होती.
                                                      सुरक्षित आणि खोल वाघोटन
                                                    खाडीमुळे गिर्ये गोदी आणि
                                                    वाघोटण गोदी
                                                      यांचा मालवाहतुकीचा उपयोग
                                                      करून घेतला जात होता. पूर्वी
                                                      या बंदरातून मोठ्या प्रमाणात
                                                      माल वाहतूक आणि प्रवासी
                                                    वाहतूक होत असे. पणजी-मुंबई प्रवासी
                                                      देवगड प्रमाणेच विजयदुर्ग
                                                      बंदरातही जाता येता थांबत
                                                      असे. परंतु मागील 20- 25
                                                    वर्षापासून या बंदरातून होणारी
                                                    प्रवासी
                                                      वाहतूक बंद आहे. मालवाहतुकीची
                                                      इतर साधने उपलब्ध झाल्याने
                                                      पूर्वीच्या मानाने मालवाहतूक
                                                      बरीच कमी झाली आहे. सध्या
                                                      या बंदरातून कोल्हापूर भागातील
                                                      साखर कारखान्यातील लाखो
                                                    टन ऊसाची मळी निर्यात होत
                                                    आहे.
                                                      शासनाच्या नवीन बंदर विकास धोरणानूसार हे बंदर आंरराष्ट्रीय
                                                      बंदर म्हणून विकसित करण्यात
                                                      येत आहे. त्यासाठी शासनाने
                                                      हिंदुस्थान इनफ्रास्ट्रक्चर
                                                      प्रोजेक्ट अन्ड इंजिनियरिंग्ज
                                                      प्र.लि. या कंपनीशी करार
                                                      केला आहे. या बंदरासाठी
                                                      हजारो कोटी
                                                      हजारांची गुंतवणूक होणार
                                                      असून हे बंदर पूर्णपणे विकसित
                                                      झाल्यानंतर
                                                      प्रतिवर्षी 75 मिलियन कार्गो
                                                      हाताळला जाणार आहे.  | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | श्री
                                                  रामेश्वर मंदिर, गिर्ये | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                                तळेरे-विजयदुर्ग
                                                      मार्गावर विजयदुग्र पासून
                                                      3 कि.मी. अंतरावर गिर्ये हे
                                                      गांव आहे. येथे पवनचक्की,
                                                      आंबा संशोधन केंद्र, ग्रामदैवत
                                                      श्री चौंडेश्वर देवी मंदिर,
                                                      सुप्रसिध्द श्री रामेश्वर
                                                      मंदिर असल्याने हा सर्व परिसर
                                                      पहाण्यासारखा आहे.  
                                                   
                      पेशवेनाना फडणवीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी हे मंदिर बांधले
                      आहे. मंदिर साधे, कौलारू असून समोर पाच दीपमाला आहेत. हे मंदिर
                      खोलगट भागात असल्याने समोरून किंवा मुख्य रस्त्यावरून मंदिर
                      दिसत नाही. आत जाण्यासाठी 150 मी. लांब, 15 मी. खोल असा जांभ्या
                      दगडाच्या अखंड खडकातून खोदून मर्ग बनविलेला आहे. मंदिरातील
                      मुख्य गाभा-यात शिवपिंडी आहे. बाहेरील बंदिस्त भागात सुमारे
                      50 किलो वजनाची शुध्द चांदीची, नंदीवर आरूढ असलेली चतुर्भुज
                      श्री शंकराची प्रासादिक मूर्ती आहे. ही मूर्ती अतिशय प्रेक्षणीय
                      आहे. 
                                           
                                           इ.स.1792-93
                                          च्या दरम्यान आनंदराव धुळपांनी जप्त केलेल्या
                                          एका परदेशी जहाजावर अजस्र घंटा सापडली.
                                          आनंदराव धुळपांचे वारस कृष्णराव धुळप यांनी
                                          ती घंटा इ.स. 1827 साली रामेश्वरला अर्पन
                                          करून मंिदराच्याप् प्रवेशद्वारावर टांगली
                                          असून ती आजहीचांगल्या स्थितीत आहे. मंदिराच्या
                                          आवारातच उजव्या बाजूला मराठ्यांच्या आरमाराचे
                                          सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी आहे.
                                          ते शिवभक्त होते. रामेश्वर मंदिरासभोवतालची
                                          दगडी, फरशी सरखेल संभाजी आंग्रे यांनीच
                                          बांधली आहे.  
                                           
                      मंदिरातील कलाकुसरीचे काम प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कार आहे.
                      प्रशस्त बांधणी, प्राचीन चित्रांची आरास मंदिराच्या भव्यतेत
                      भर घालते. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंगांची
                      अनेक रंगीत चित्रे असून अद्यापही त्यातील पुष्कळ चित्रांचे
                      रंग चांगल्या सिथतीत आहेत. मंदिरातील नक्षीकाम पहाण्यासारखे
                      आहे. 
                                           
                      तेथील पुरातनकाळाचे साक्षात्कार देणारे देखावे, चोहोबाजूंच्या
                      उत्तुंग कडा, ऐतिहासिक दस्तऐवज, प्रत्येक पावलावर येथे इतिहासाची
                      वैशिष्टये भरलेली आहेत. याच मंदिराच्या परिसरात आंग्रेंच्या
                      घराण्यातील सती गेलेल्या सखीची समाधी, मंदिराच्या चार दिशांचेचार
                      बंगले, मंदिराच्या प्रवेशद्वारी बांधलेली कमान, भव्य बंगली
                      आणि रामश्वराची मन आकर्षून घेणारी मनोहारी चांदीची मूर्ती या
                      सर्व गोष्टी म्हणजे ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्हींचा सुंदर संगम
                      होय.  
                                           
                                           प्रतिवर्षी
                                          महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा
                                          केला जातो. या शिवाय श्रावण महिन्यातील
                                          प्रत्येक सोमवारी या परिसरातील असंख्य
                                          भाविक रामेश्वराचे दर्शन घेतात. आवर्जून
                                          भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यासारखे
                                          हे स्थळ आहे. 
                                           
                      येथून जवळच श्री चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे.देवीची मूर्ती
                      दक्षिण भारतातील देवतांप्रमाणे आहे. कोकणात अशा मूर्ती क्वचितच
                      आढळतात. हे विजयदुर्ग-गिर्येचे ग्रामदैवत आहे. तेथे देवदिवाळी
                      दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. हा परिसर अतिशय निसर्गरम्य
                      आहे.  | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                          
                                            
                                               | 
                                             
                                            
                                              |   | 
                                             
                                            
                                              | श्री
                                                  विमलेश्वर मंदिर आणि पांडवकालीन
                                                  लेणी, वाडा. | 
                                             
                                            
                                              |     | 
                                             
                                            
                                               देवगड
                                                      विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग
                                                      पासून 14 कि.मी. अंतरावर
                                                    आणि विजयदुर्ग पासून 18 कि.मी.
                                                      अंतरावर वाडा हे गांव आहे.
                                                      या गावापासून 1 कि.मी. अंतरावर
                                                      किंवा वरील मार्गावरील विमलेश्वर
                                                      मंदिर थांबा येथून अर्धा
                                                    कि.मी.
                                                      वर फणसे -पडवणे जाणा-या
                                                    रस्त्याला लागूनच श्री देव
                                                    विमलेश्वर
                                                      मंदिर आहे. येथून काही अंतरावर
                                                      सुंदर पडवणे सागरकिनारा
                                                    आहे. संपूर्ण उत्तम डांबरी
                                                    रस्ता आहे. 
                                                   
                      श्री विमलेश्वर मंदिर जांभ्या दगडाच्या गुहेत असून असून गाभारा,
                      सभागृह व गॅलरी अशा तीन टप्प्यात ही गुहा कोरलेली आहे. गाभा-यामध्ये
                      शिवलिंग असून मंदिरासमोर भव्य अंगण आहे. अंगणापासून मंदिराची
                      उंची सुमारे 60 ते 65 फूट आहे. मंदिराच्या दर्शनी मध्यभागावर
                      पाच मानवरूपी नग्न शिल्पे कोरलेली असून गुहेच्या दोन्ही बाजूला
                      माहुतासह दोन हत्ती कोरलेले आहेत. अंगणातून देवळात प्रवेश केल्यावर
                      प्रथम गॅलरी लागते. तेथे एक मोठी घंटा टांगलेली आहे. त्याच्यापुढे
                      कातळावर 35 फूट रूंद व 15 फूट उंच असे सभागृह आणि त्याच्या
                      बाजूने नक्षीकाम केलेले मोठेमोठे खांब आहेत. तेथून थोडया पाय-या
                      चढल्यानंतर साडेसहा फूट उंच 16 फूट रूंद, 16 फूट लांब असा गाभारा
                      लागतो. त्याच्या मध्यभागी शिवलिंग आहे. अशा प्रकारचे उंचावर
                      शिवलिंग असणारे हे एकमेव मंदिर आहे. 
                                           
                      मंदिरातील शिवपिंडावर दररोज अभिषेक केला जातो. अभिषेकासाठी
                      वापरले जाणारे पाणी, दुध, निर्माल्य झालेली फुले इ. शेजारच्या
                      डब्यात बकले जाते. ती तेथेच मुरतात परंतु त्यातील पाण्याचा
                      अंश अजिबात बाहेर जात नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे. 
                                           
                      या मंदिरालगत मधुर पाण्याचा झारा बारामाही वहात असतो, घनदाट
                      वनराईमुळे येथील पाणी उन्हाळयाच्या थंडगार असते. तर पावसाळ्यात
                      आणि हिवाळ्यात ते उबदार असते. मंदिराच्या दोन्ही बाजूला काळभैरव
                      गुहा आहे. 
                                           
                      रस्त्यावरून मंदिराचा फक्त कळस दिसतो. मात्र प्रत्यक्षात पाय-या
                      उतरून अंगणामध्ये जाऊन पाहिल्यास मंदिराच्या भव्यतेची कल्पना
                      येते. सुंदर शिल्पकला आणि त्याच्या जोडीला रम्य निसर्ग आणि
                      मानवी बुध्दी यांचा सुंदर मिलाप असलेले हे स्थळ पर्यटन दृष्टया
                      अतिशय उत्तम स्थळ आहे. येथील घनदाट वनराई, रम्या आणि शांतता
                      मनमोहून टाकते.  | 
                                             
                                            
                                              | TOP | 
                                             
                                            
                                              |       | 
                                             
                                           
                                       | 
                                     
                                    
                                      | --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | 
                                     
                                    
                                       
                                                                          देवगडपासून देवगड तालुक्यातील काही गावांचे अंतर (कि.मी.)                                        
                                       
                                          
                                            
                                              | कुणकेश्वर | 
                                              -
                                                  19 | 
                                              तांबळडेग  | 
                                              -
                                                  30 | 
                                              कोटकामते | 
                                              -
                                                  30 | 
                                              विमलेश्वर | 
                                              -
                                                  14 | 
                                             
                                            
                                              | वाघोटन  | 
                                              -
                                                  29 | 
                                              रामेश्वर | 
                                              -
                                                  29 | 
                                              सैतवडे | 
                                              -
                                                  27 | 
                                              विजयदुर्ग | 
                                              -
                                                  31 | 
                                             
                                            
                                              | शिरगांव | 
                                              -
                                                  23 | 
                                              वाडा | 
                                              -
                                                  14 | 
                                              मिठबांव | 
                                              -
                                                  26 | 
                                              पोखरबांव  | 
                                              -
                                                  13 | 
                                             
                                            
                                              | हिंदळे  | 
                                              -
                                                  23 | 
                                              इळये  | 
                                              -
                                                  14 | 
                                              जामसंडे | 
                                              -
                                                  5 | 
                                              गजबादेवी  | 
                                              -
                                                  29 | 
                                             
                                            
                                              | नांदगांव | 
                                              -
                                                  40 | 
                                              पडेल
                                                  कॅन्टीन | 
                                              -
                                                  15 | 
                                              तळेबाजार | 
                                              -
                                                  17 | 
                                              पडवणे  | 
                                              -
                                                  18 | 
                                             
                                           
                                           
                                                                          विजयदुर्ग पासून देवगड तालुक्यातील काही गावांचे अंतर (कि.मी.) 
                                           
                                          
                                            
                                              | तरळा | 
                                              -
                                                  54 | 
                                              वेहगिवे | 
                                              -
                                                  48 | 
                                              गिर्ये  | 
                                              -
                                                  7 | 
                                              पडवणे | 
                                              -
                                                  27 | 
                                             
                                            
                                              | पाटगांव | 
                                              -
                                                  39 | 
                                              मणचे | 
                                              -
                                                  36 | 
                                              पडेल
                                                  कॅन्टीन | 
                                              -
                                                  14 | 
                                              वाघोटन | 
                                              -
                                                  24 | 
                                             
                                            
                                              | देवगड | 
                                              -
                                                  31 | 
                                              विमलेश्वर | 
                                              -
                                                  24 | 
                                              वाडा | 
                                              -
                                                  18 | 
                                              रामेश्वर | 
                                              -
                                                  3 | 
                                             
                                           
                                       | 
                                     
                                   
                                    
                               | 
                             
                            
                              |   | 
                             
                            | 
                         
                       
                      
  | 
                     
                                 
                  
                      | 
                    
                     | 
                    
                      
                        
                          
                            A/C
                                      Room - Double Bed Delux Room 
                                -------------------------------------------- 
                                Non
                                A/C Room - Double Bed Delux Room 
                                -------------------------------------------- 
                                Dormentory
                                A/C - Non A/C  
                             | 
                           
                          
                            |   | 
                           
                         
                         | 
                       
                     
                      
                        
                          |   | 
                         
                        
                          Veg
                                    / Non-veg food With delicious Kokani speciality 
                           | 
                         
                        
                          Malvani,
                                    Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish  
                           | 
                         
                        | 
                   
                 
                
                 | 
           
          | 
          |