Contact :  +91-9421632626    |    Email : info@hoteldiamonddevgad.com
   Plan Your Tour   
 
 

Konkan Tourist Guide
 

देवगड-विजयदुर्ग पर्यटन विषयी

चला जाऊया कोकण पर्यटनाला !
पहिली पसंती देवगड-विजयदुर्गाला !!

निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेली असतानाही एक अविकसित भाग म्हणून आज पर्यंत देवगड-विजयदुर्गची ओळख होती. वास्तविक काश्मिर-उटी च्या तसेच केरळ आणि आसामच्या तोडीस तोड येथे आज पर्यटन स्थळे असूनही त्यांना आवश्यक तेवढी प्रसिध्दी न मिळल्याने ही सौंदर्य स्थळ दुर्लक्षित राहून पर्यटन स्थळांचा मान त्यांना मिळू शकलेला नाही. दि. 31 मार्च 1997 रोजी भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हयाचे नाव जाहिर झाले आणि येथे पर्यटनाचे वारे वाहू लागले. त्यामुळे जगाच्या पर्यटन नकाशावर सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर देवगड-विजयदुर्ग चे नाव येण्याचा मार्ग मोकळा झाला.

नवयुवतीने आपल्या काळया भोर केसामधून हळूवारपणे कंगवा फिरवावा आणि भांगाच्या रांगोळीने तिच्या केशकल्पांचे विभाजन व्हावे आणि तिच्या सौंदर्यात आणखी भर पडावी अशीच अवस्था वाडातर खाडीने देवगड तालुक्याची केली आहे. या खाडीने देवगड तालुक्याचे दोन भाग केले आणि हिरव्यागार खाडीकिना-याने निसर्गसौंदर्यात आणखी भर घातली. पडवणे, विजयदुर्ग, मिठमुंबरी, कुणकेश्वर, तांबळडेग येथील मुलायम, सोनेरी, पांड-या शुभ्र वाळूचे समुद्र किनारे, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले देवगड-विजयदुर्ग किल्ले, विमलेश्वर, लिंगेश्वर, रामेश्वर, कुणकेश्वर, पावनाई, ब्रह्मदेव, ब्राह्मण देव, गणपती, दत्त, गजाबादेवी, दिर्बादेवी, खवळे गणपती इ. प्राचीन मंदिरे प्रत्येक घरासमोर असलेले तुळशी वृंदावन, शेणाने सारवलेली अंगणे, चौसोपी घरे, आमृता सारखी मालवणी बोली, माडासारखी मोठया मणाची माणसे, सर्वत्र आढळणा-या फणस, काजू, चिकू, जग प्रसिध्द हापूस आंब्याच्या बागा, किना-यावरील सुरूची बने, खाडी किनारी आणि गावोगावी असणा-या माडा-पोफळीच्या रांगा या डोळयांची पारणी फेडणा-या गोष्टींचा विचार करता ही भारताची स्वर्ग भूमीच आहे असे मानन्यास हरकत नाही.

विजयदुर्ग-देवगड ही विजयी देशभूमी आहे.परशुरामाने वसविलेली ही पावन भूमी आहे.
विजयदुर्ग-देवगड नावातच सर्व काही आहे.

देवगड तालुक्याला आध्यात्मिक, साहित्यीक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक वारसा आहे. याचे येथे पदोपदी प्रत्यंतर येते. या तालुक्यातील प्रत्येक गाव हे पर्यटन स्थळच आहे.

केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला येथील सौंदर्य स्थळांचा, निसर्ग स्थळांचा ऐतिहासिक स्थळांचा, परिचय करून देऊन पर्यटक इकडे मोठया संख्येने आकृष्ट करण्यासाठी ही तळमळ.

येथील ब-याच स्थानिक लोकांनाही आपल्या भागातील पर्यटन स्थळांची परिपूर्ण माहिती नाही. त्यांनाही या स्थळांची महिती कळावी हाही उद्देश या मागे आहे.
येथील अनेक स्थळे अजूनही प्रसिध्दीपासून दूर आहेत. मात्र त्यांचे सौंदर्य, वैशिष्टये इतकी आगळी-वेगळी आहेत की, एकदा आलेला पर्यटक पुन्हा-पुन्हा येण्याचा निश्चय करूनच परतेल.

पर्यटकांप्रमाणे इतिहासप्रेमींना, अभ्यासकांना, संशोधकांना, जिज्ञासूना, कोकण प्रेमीचना आणि सौंदर्याच्या उपासकांना विनालंब आणि बिनाअडथळा आनंद लुटता यावा या हेतूने हे माहिती परिपूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे.

सदर माहिती देताना ब-याच पुस्तकांचा, पुस्तिकांचा, नियतकालिकांचा, नकाशांचा, वर्तमानपत्रांचा संदर्भ घ्यावा लागला. या संदर्भ साहित्याचे लेखक, संपादक, प्रकाशक यांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहे.

आपण देवगड-विजयदुर्ग या परिसराचा मनमुराद आनंद लुटाल आणि तसा आनंद लुटण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहन कराल, अशी आशा बाळगतो.

कारण . . .

देवगड आपलोच आसा !

   देवगड शहरातील पर्यटन स्थळे
   देवगड परिसरातील पर्यटन स्थळे
   विजयदुर्ग परिसरातील पर्यटन स्थळे
   देवगड तालुक्यातील सांस्कृतिक कार्यक्रम 

TOP
  
     
Kunakeshwar Temple

Set on the backdrop of a five kilometer long seashore, this place is recognized as “Kashi” of Konkan. The place is well-known for the beautiful temple of Lord Shiva, built by the Yadavas in the 11th century.

This was also the place of residence of the Pandavas during their exile. The place is surrounded by serene greenery every moment is captivating.

Anand Wadi Jetty

Here, hundreds of trollers (mechanized fishing boats) gather tonnes of fish everyday. These fish are sorted, cleaned, packed, stored in cold storage, auctioned and sent to various large cities across India. One can be a witness to all these processes very closely and in depth.

In addition, there are other industries such as canning, fish oil production, ship building and allied training centers at Devgad.

Girye Rameshwar Temple

This temple is a monolithic structure built underground, with steps carved in the 50 meter rock. Here, the idol of Lord Shiva, made of around 50 kg of pure Silver is simply stunning. The walls of the temple are full of intricate drawings and scenes from “Mahabharata” that leaves you mesmerized.

Other attractions around are the mango research center and the last resting place of yet another brave and patriotic Admiral of the Maratha supremacy Sambhaji Angre.

The speciality of this temple is that it is almost 200 ft under ground. It is not visible from the main road. The only sign that confirms its existance is an old welcome arch. A 20 ft wide road has been carved inside the hill that leads to a massive plateau on which this historical temple welcomes you.

Vijaydurg Fort

This is one fort which was a bastion in the naval power of Chhatrapati Shivaji Maharaj. Built about 800 years ago, this fort is spread over 17 acres of land.

The speciality of this fort is a well of sweet water surrounded by sea on almost all sides. Many structures like the Hanuman temple, Bhavani mata temple, horse stable are standing in their original glory, making the fort worth visiting. Seasonal boating facility in the sea is also available. This, again, is a 'moving' experience.

Waghotane (village)

This place is famous for the mango plantations, a port, a creek and quarries producing the well-known red 'jambha' stone. One can also have a look at a huge bungalow built by the British to house the Portuguese King Theeba.

Mithbav Beach

The beach here is lined by trees almost touching the skies. The speciality of this beach is the white soft sand all throughout. Mithbav village nearby is entirely existent on this sand. A bare-footed leisure walk on this beach, watching sea turtles, seagull and at times dolphins will make you forget the world for sure.

Saitavade Waterfall

This perennial waterfall is located about 30 km from Nivant. You must visit here during the monsoons, the scene will simply leave you spell-bound.

Lighthouse

Spread over a sprawling 120 acres, this fort was built in 1705 by Kanhoji Angre, a patriotic and valiant admiral of the Maratha reign. Even today, almost entire fort is in a fairly original condition. Various structures like Ganesh temple, light-house, ancient scriptures and cannons remind us of the glorious times of the bygone era. Watching sunset from here is a feast for the eyes and whale of an opportunities for the shutter-bugs.

Nivant arranges for a guided tour to the fort and Lighthouse. The international coding and communication pattern of the lighhouse is worth observing.

Devgad Port

Built in 1958, this was a gateway to Konkan in the old days. This was also a major fishing center. The entire area is surrounded by extensive plantations of the world-famous “Devgad Hapus (Alphanso) mango and coconut.

Nearby is the little Devgad beach. Since it is situated between two mountains, it is absolutely pristine with picturesque surroundings.

Devgad Bazaar

A weekly bazaar at Devgad is a galore of all essential things in life. Day long Friday bazaar offers everything from clothing to food to toys to fresh fish and crabs to almost everything under the sun.

     
Alphonso Mango (Devgad Hapus)

Alphonso mango is the unique speciality of Devgad. The soil here produces the best mango and other local fruits such as jackfruit and cashew that are exported globally. In India Mango is also termed at the king of all fruits.

Nivant arranges guided educational tour to the mango and fruit plantations / pulp factory.

देवगड तालुक्यातील आंबा उत्पादन - देवगड हापूस आंबा

हिंदुंच्या अनेक धार्मिक विधीत आंब्यांची पाने, मोहोर आणि फळे पवित्र व आवश्यक मानतात. आंबा हे पौष्टिक, चवदार, आणि औषधी फळे आहे. भरपूर सावली, त्याप्रमाणगे जळाऊ आणि इमारतीसाठी लाकूड देणारा हा वृक्ष आहे.

भारतात आंब्यांची लागवड सुमारे 4000 वर्षांपासून होत आहे. एकट्या भारतात 1000 च्या वर जाती आहेत. या पैकी हापूस ही जात सर्वश्रेष्ठ आहे.

भारतात हापूस उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, या राज्यात मोठया प्रमाणात पिकतो. हापूस आंब्याला संपूर्ण दक्षिण कोकण किनारपट्टी उत्तम असली तरी देवगड परिसरातील हापूस आंबा हा देवगड हापूस या नावाने भारतात प्रसिध्द आहे.

देवगड भागात वर्षाला एका हापूस कलमाला 1000 पर्यंत फळे येतात आणि हा जा्गतिक उच्चांक आहे. मात्र दरवर्षी फळे येत नाहीत. ती एक वर्ष आड येतात. पायरी किंवा गावठी आंब्याला यापेक्षा अधिक फळे येतात्. आंबा साधारणपणे मोहोर आल्यापासून 4 महिन्यांनी पक्व होतो.

सध्या देवगड हापूस चव, रंग, वजन आणि टिकाऊपणा याबाबत जगप्रसिध्द लंडन आणि न्यूयॉर्क येथील आंब्याशी स्पर्धा करत आहे. देवगड तालुक्यात, सर्वत्र हापूस आंब्याच्या बागा आहेत. सडा भागात विरळ झाडे आहेत. तर खाडी किनारी खार भूमीत पाडा पोफळीचे प्रमाण अधिक आहे. उतरत्या आणि पाण्याचा निचरा होणा-या जमिनीत हापूस आंबा उत्तम पिकतो. या तालुक्यातील 35% लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत. येथे 25 हून अधिक आंबा वहातूक कंपन्या आहेत. हंगामात दिवसा सुमारे 50 ट्रक आंब्याचे उत्पादन निघते. केवळ हापूस आंब्याची देवगड तालुक्यातील वार्षिक उलाढाल रू. 450 कोटीची आहे.

TOP

मत्स्य व्यवसाय

भारतातील 9 राज्ये एकूण समुद्रकिनारी असून एकूण किनारपटटीची लांबी 7,517कि.मी. आहे. महाराष्ट्राच्या किनारपटटीची लांबी 720 कि.मी. आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीची लांबी 121 कि.मी. आहे. देवगड, विजयदुर्ग, तारामुंबरी, मिठमुंबरी, कातवण, तांबळडेग येथे मच्छिमार केंद्रे आहेत. या ठिकाणी समुद्रातील मासेमारी चालते. त्याचप्रमाणे वाघोटन, वाडातर, मुंबरी, तांबळडेग येथील खाडयांध्येही मासेमारी चालते.
येथे सुमारे 200 ट्रॉलर्स आणि 350 होड्या आहेत. या तालुक्यात सतरा ठिकाणी रापण पध्दतीने मच्छिमारी होती. मात्र सध्या यांत्रिक बोंटींच्या मोठया प्रमाणातील शिरकावामुळे आता फक्त तारामुंबरी, कातवण आणि तांबळडेग येथे काही प्रमाणात रापण पध्दतीने मासेमारी केली जाते. येथे दरवर्षी 7000 टनहून अधिक मासळी मिळते. वार्षिक उलाढाल 125 कोटी रूपयापेक्षा अधिक होत असून तालूक्यातील सुमारे 20% लोक या व्यवसायाशी निगडीत आहेत. विजयदुर्ग आणि देवगड येथेे नैसर्गिक सुरक्षित बंदरे असून येथे माशांची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री होते.

या परिसरात पापलेट बांगडा सारंगा, कोळंबी, म्हाकूल, मुशी, बोंबील, ढोमा, रावस शेवंउ, बगळी, शिंगाळा, शेंगटी, बळा, सुरमई, तारली, पेडवे, कापी, लेपी, राणामासा, सौंदाळा, वाम इत्यादी प्रकारचे मासे मोठया प्रमाणात मिळतात. खाडीतील मुळे, तिसरे (इसरक्या/शिवल्या), कालवे यांचाही व्यवसाय चालतो. हंगामानूसार खेकडे ही मिळतात. माशांची लिलाव पध्दतीने खरेदी विक्री आनंदवाडी जेटी येथे केली जाते.

TOP

चिरेखाण

देवगड तालुक्यातील सडा भागात लहान मोठ्या ब-याच चिरेखाणी असल्या तरी देवगड परिसरात लिंगडाळ आणि विजयदुर्ग परिसरात वाघोटन येथे हा मोठ्या प्रामणातव्यवसाय चालतो.

सडा भागातील पडीक जमिनीत पृष्ठभागाकडून 3 फूटांपासून खाली जांभ्या खडकात हा चिरा काढला जातो. जांभ्या दगडाला साधारणपणे 1-1 ।। फूटावर चिर पडून चौकोनी आकाराचे चिरे काढले जातात. म्हणून याला चिरे म्हणतात. कोकणत सर्वत्र अशाच चि-यांपासून घरे बांधलेली आढळतात. या चि-यांचे वैशिष्टय म्हणजे भिंतीना जागा कमी लागते. घर बांधाताना चिखल किंवा सिंमेंट या शिवाय आणखी कोणताही कच्चा माल लागत नाही. अशा चि-यांनी बांधलेली घरे टुमदझ्र्रिं आणि उत्कृष्ट दिसतात. लिंगडाळ येथील चि-यापेक्षा वाघोटन येथील चिरा आकाराने मोठा आणि दणकट असतो. हल्ली यंत्राद्वारे खडक कापून चिरे काढले जातात.

चिरे काढणारे लोक स्थानिक असले तरी त्यांची वाहतूक आणि या अनुषंगाने इतर कामे करणारे मजूर सांगली, सोलापूर भागातील आहेत. या व्यवसायात सुमारे 10000 हून अधिक लोक गुंतले आहेत. अशा प्रकारे पडीक जमिनीचा उत्तम उपयोग केला जातो. चिरा तासून पडलेली माती आणि फुटके दगड रस्ता बांधण्यासाठी, कंपाऊंडसाठी आणि आंबा कलमांना अळी बांधण्यासाठी होतो. चिरे काढलेल्या ठिकाणी नैसर्गिकरीत्या भरपूर माती साठते.

वर्षाकाठी कित्येक कोटींची उलाढाल या व्यवसायात होतो.

सर्प

हापूस आंब्याप्रमाणे सर्पांसाठीही देवगड प्रसिध्द आहे. जगामध्ये सुमारे 2500 जातीचे सर्प आढळतात. त्यापैकी भारतात 261 जातीचे सर्प आढळतात. यातील बहुतांश सर्प देवगड तालुक्यात आढळत असले तरी नाग, मण्यार (कांडर), घोणस, फुरसे यांसारखे निमविषारी सर्प मोठ्या प्रमाणात आढळतात.

येथील हवामान सर्पांना फार पोषक आहे. पूर्वी जांभ्या दगडांचे गडगे (कंपाऊंड वॉल) असायचे, त्यामुळे सर्पांना रहाण्यासाठी आयतीच जागा मिळायची. मात्र आता बहुतांश गडगे चिरंबंदी झाल्याने, वस्त्या वाढल्याने आणि पर्जन्यमानही कमी झाल्याने सर्पांची संख्या घटली आहे.
आपल्या कृषीप्रधान देशात सुमारे 30% अन्नधान्याची नासाडी उंदीर करतात. सर्पांचे मुख्य अन्न उंदीर असल्याने त्यावर नैसर्गिकरीत्या नियंत्राण ठेवण्याचे काम सर्प करतात.

विषारी सर्पांच्या विषाचां वापर हृदयरोग, दमा, फेकरे, वेदनाशामक इ. औषधांमध्ये केला जातो. सर्पदंशावरील एकमेव औषध प्रतिसर्पविष (Anti Snake-Venom) तयार करण्यासाठी नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या सर्पांचे विष एकत्र करून तयार केले जाते. पूर्वी वर्षातून एक-दोन वेळा असे सर्पांचे विष काढण्यासाठी शासनाचे पथक येथे येत असे.

सर्प ही निसर्गाची अनमोल देणगी असून त्याचे संरक्षण, संवर्धन आणि संशोधन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. सर्पांबाबत गैरसमज दूर करून सर्प मानवाच्या हिताचाच आहे, अशी जनजागृती आता होऊ लागली आहे.

आंग्रीया बँक

देवगड विजयदुर्गच्या पश्चिमेला सुमारे 100 कि.मी. म्हणजे साधारणपणे 70 सागरी मैल अंतरावर अरबी समुद्रात आग्रीया बँक हे पाण्याखालील बेट आहे. हे बेट मालवणपासून 120 कि.मी. अंतरावर तर रत्नागिरीपासून 170 कि.मी. अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी शिडाच्या होडीने सुमारे 12 तास तर यांत्रिक नौकेला हवामानानूसार 4 ते 5 तास लागतात. या बेटाची सुमारे 39 कि.मी. लांबी आणि रूंदी 10 कि.मी. असून सर्वसाधारण चौकोनी आकाराचे आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे 20 मी. इतकी खोली आहे.

या आंग्रीया भागात बँकेच्या विहंगम आणि पर्यटनाच्या माहमेरू ठरणा-या भागाचे पहिले संशोधक सारंग कुळकर्णी आहेत. महाराष्ट्र शासनाने प्राथमिक स्वरूपात याच्या विकासासाठी 5 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याने पर्यटकांना आता समुद्रातले गाव बधण्याचे भाग्य मिळणार आहे. यामुळे या समुद्र-गावात असलेले अनेक चमत्कार आता जगासमोर येतील या भागात जगातील दुर्मिळ असे जलचर तसेच जीवंत मोठे प्रवाळसमूह, देवमासे, समुद्र मत्स्यजीवन, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी, विश्रांतीसाठी थांबलेले व्हेल आणि शार्क प्रजातीतील मासे पाण्यात बुडालेली जहाजे, त्यातील माल, निळसर स्वच्छ पाणी, कातळीचे भव्य पठार आणि अद्भूत असे बरेच काहीजे आतापर्यंत पुढे आले नाही ते, तेथे पोहोचण्याची, सौंदर्य न्याहाळण्याची अद्भूत संधी या आंग्रीया बँकेमुळे मिळणार आहे.

नावाप्रमाणे भविष्यात आंग्रीया बँक हे बेट पर्यटकांनी कॅश करणारी बँक ठरणारी आहे. यामुळे कोकणाची जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याइतपत अमाप सौंदर्य या बेटात सामावले आहे.

या ठिकाणी मासेमारी होत नसल्याने माशांच्या दुर्मिळ आणि भल्यामोठया प्रजाती, विविध रंगी प्रवाळ आढळून आले आहे. थायलंड, मॉरिशियस, लक्षद्विप, अंदमान, निकोबार, ऑस्ट्रेलिया येथील पर्यटन प्रवाळ समूहांवर चालते. याप्रमाणे आंग्रीया बँक बेटामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या पर्यटन विषयक संकल्पना बदलणार आहेत.

या आगळयावेगळया पर्यटनाचा तीन प्रकारे आनंद घ्यावा लागणार आहे. त्यात प्रथम डायरेक्ट डायव्हींग, दुसरे म्हणजे पिंज-यातून पर्यटकांना पाण्यात सोडणे आणि तिसरे म्हणजे काचेच्या बसेस पाण्यात सोडून पर्यटकांनी या बेटावरील सागरी वैविधतेचा अनेभव घेता येईल. पूर्वी विजयदूर्ग बंदरात आंग्रेचा असलेला दरारा शत्रूला नामोहरम रिण्याची त्यांची कल्पकता पाहता आंग्रेच्या शौर्यपराक्रमामुळेच या बेटाला आंग्रीया म्हणून संबोधले जाते.

आपल्या शत्रूंवर गनिमी काव्याने हल्ला करण्यासाठी, शत्रूंवर टेहळणी करण्यासाठी, आरमाराची देखभाल करण्यासाठी आंग्रेंनी या बेटाचा निश्चित उपयोग करून घेतला असेल. कारण विजयदुर्ग किल्ल्यापासून सुमारे 300 फूट अंतरावर 12 मी. लांबीची पाण्याखलील भिंत याच कारणासाठी बांधली होती. ती आजही आहे.

येथील निळसर, स्वच्छ व नितळ पाण्यामध्ये मासेमारी करणे फार सोपे जाते. येथे विविध जातीचे मोठे मासे सापडत असल्याने मच्छिमारांचेही आता इकडे लक्ष लागले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने राज्य शासनाने या दृष्टीने टाकलेले पाऊल विजयदुर्ग-आंग्रीया बँकेच्या विकासासाठी निश्चितच पर्यटनात भर टाकणारे आहे.

ऑलिव्ह रिडले कासवे

कासवांच्या जातीत दुर्मिळ होत चाललेली ऑलिव्ह रिडले जातीचे कासव देवगड तालुक्याच्या किनारपट्टीवरील तांबळडेग, मिठमुंबरी, देवगड, पडवणे आणि विजयदुर्ग किना-यावर आढळतात. यापैकी तांबळडेग आणि पडवणे येथील किनारा कासवांची उत्पत्ती क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तांबळडेग येथिल निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने येथील खाडीच्या द्वाराकडील वाळूत आवश्यक नैसर्गिक क्रिया कृत्रिमरित्या तयार करून ऑलिव्ह रिडले जातींच्या कासवांच्या अंडयांचे विणीच्या हंगामात (ऑक्टोबर ते एप्रिल) जतन करून ठेवले जाते. ठराविक काळाने या अंडयांतून पिल्ले जन्माला येतात. या पिल्ल्यांच्या सुरक्षिततेची विशेष दक्षता घेतली जाते. यासाठी वनविभागाचे सहकार्य मिळते. दुर्मिळ होत चाललेल्या ऑलिव्ह रिडले या कासवांच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षापासून येथील निसर्ग प्रेमी आणि वन विभाग जाणीवपूर्वक प्रयत्न्ा करीत आहे. किनारपट्टीवर आढळणारी या कासवांची अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी उपया योजना करण्याबरोबरच लोकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. आतापर्यंत सुमारे 2000 पिलांचे संवर्धन करून समुद्रात सोडण्यात आली आहेत. कासव संवर्धन मोहिमेला इ.स. 2002 मध्ये सुरूवात झाली. कासवांचे संवर्धन व्हावे आणि कोकणचा पर्यटनदृष्टया विकास व्हावा, पर्यावरण प्रमींकडून या मोहिमेला पाठबळ मिळावे म्हणून विविध ठिकाणचे निसर्गप्रेमी प्रयत्नशील आहेत. गुहागार येथील समुद्रकिनारीही असे प्रयत्न सुरू आहेत.

  

Guest Book   |   Photo Gallery   |   Tell-A-Friend
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory A/C - Non A/C
 
 
Veg / Non-veg food With delicious Kokani speciality
Malvani, Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
            © Hotel Diamond, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.